नगर | १२ जुलै | प्रतिनिधी
(Social) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे निवृत्त जनरल मॅनेजर अमर गुरप यांची अ.नगर रोटरी क्लब सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल मित्र परिवारातर्फे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नंदकिशोर आढाव म्हणाले की प्रतिकूल परिस्थिती असताना अतिशय परिश्रम घेत अल्पसंख्यांक कुटुंबात कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना अमर गुरप यांनी फार कष्टातून शिक्षण घेत नोकरीत प्राप्त केली. व इन्शुरन्स कंपनीत जनरल मॅनेजर पदावर अनेक वर्ष कार्यरत होते. निवृत्तीनंतर सामाजिक कार्याचा अनुभव व जाणीव असल्याने अहिल्यानगर रोटरी क्लब सचिवपदी एक मताने निवड झाली.
(Social) त्याबद्दल मित्र परिवारातर्फे अभिनंदन सोहळा घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी चित्रकार प्रा. रवींद्र सातपुते यांनी विडंबन कविता सादर केल्या. पत्रकार आबिद दूल्हे खान यांनी शेरोशायरी करत मैफिलित रंग भरला. मित्रां तर्फे अभिनंदन व शुभेच्छांचा स्विकारताना प्रथमच मन मित्रांच्या प्रेमामुळे भाव विभोर झाले. आपल्या सहवासातून विचारातून मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. भविष्यात सचिव पदाच्या कार्यकर्दीत विविध सामाजिक कार्यात उपेक्षितांना अनाथांना दिव्यांगांना उत्कर्ष व मदतीसाठी विविध कार्यक्रमाचे रोटरी क्लब तर्फे आयोजन करण्याचा प्रयत्न केला जाईल. कृतज्ञता व्यक्त करताना अमोल गुरप यांनी सांगितले.
याप्रसंगी जयंत जोशी, शरद मडूर, अशोक गिरी यांनी मनोगतातून अमर समवेत एकत्र अनुभवलेल्या सुखद आठवणी जागवल्या.