डॉक्टर म्हणजे फक्त वैद्य नाहीत, ते समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत – इमरान शेख
नगर | 6 जुलै | प्रतिनिधी
(Social) डॉक्टर म्हणजे फक्त वैद्य नाहीत, ते समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सेवेचे आपण ऋणी आहोत. थायरॉईड, लिपिड प्रोफाईल, शुगर, व चरबी अशा अनेक महत्वाच्या तपासण्या मोफत करून देणे हा खरोखरच एक समाजोपयोगी आणि आदर्श उपक्रम आहे.
(Social) आज अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवली, हीच खऱ्या अर्थाने या उपक्रमाची यशोगाथा आहे.
अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू राहो ही अपेक्षा अल करम हॉस्पिटलचे इमरान शेख (भाईजान) यांनी व्यक्त केली.
(Social) किंग्जगेटरोड रामचंद्र खुंट येथील पटेल स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने डॉक्टर डे निमित्त मोफत रक्तातील थायराइड,चरबी, लिपीड प्रोफाईल, शुगर व इतर रक्त तपासण्या व निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डायबेटोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट डॉ. अशपाक पटेल, अल करम हॉस्पिटलचे तौफिक तांबोली,इमरान शेख भाईजान, मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव डॉ कमर सुरुर आदि उपस्थित होते.
यावेळी रुग्णांची तपासणी डॉ अशपाक पटेल यांनी केली. रक्त तपासण्या तुषार वर्पे, किरण वर्पे, अजीज पठाण, वसीम शेख यांनी केले. या शिबीरात अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला.