---Advertisement---

Social | वह्यांचे वाटप एक सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीचा एक छोटासा हातभार आहे – डॉ.अशपाक पटेल

On: Sunday, July 6, 2025 8:15 PM
---Advertisement---

नगर | प्रतिनिधी |

Social | राणी सुलताना चांदबीबी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना ही आदरांजली वाहतानाच त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनातून आपण शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांनी आपल्या शौर्य, बुद्धिमत्ता आणि नारीशक्तीचा उत्तम आदर्श आपल्या पुढे ठेवला.राणी सुलताना चांदबीबी यांच्या स्मरणार्थ मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी आणि रहमत सुलतान फाउंडेशन यांच्या वतीने एक छोटासा पण अर्थपूर्ण उपक्रम राबवित आहेत तो म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप.
हा उपक्रम म्हणजे केवळ वह्यांचे वाटप नव्हे,तर एक सामाजिक बांधिलकी, शिक्षणाविषयीची जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीचा एक छोटासा हातभार आहे.असे प्रतिपादन पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉ अशपाक पटेल यांनी केले.

Social | मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशन यांच्या वतीने, अहमदनगरच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या राणी सुलताना चांदबीबी यांच्या पुण्यतिथी निमित्त महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. अहमदनगर छावणी परिषदेच्या महात्मा गांधी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

Social | या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉ. अशफाक पटेल,अल करम हॉस्पिटलचे तौफिक तांबोली, मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, शिक्षिका सुमैय्या सय्यद, अरविंद कुडीया, शेख नविद्दुसहर व मुबीना सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्याची उपलब्धता वाढवण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचाही संदेश दिला गेला.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात शफी हज उमरा टुर्स, राजकुमार गुरनानी, युनूसभाई तांबटकर, लालाभाई शेख, विकास पिटेकर, चारु ससाणे, कांचन तांबोळी, डॉ. शैलेंद्र खंडागळे, अर्जुन चौरे, सुरेश पवार, नरेश पेवाल, सारीका रघुवंशी यांसारख्या अनेक दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले.
प्रस्ताविक करताना आबिद खान म्हणाले की, या वह्या म्हणजे केवळ पानं नाहीत, तर तुमचं स्वप्नं लिहिण्यासाठीची एक संधी आहे. अभ्यास करा, प्रगती करा, आणि आपल्या ज्ञानाने आपल्या कुटुंबाचे, शहराचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा.
शेवटी, राणी चांदबीबींसारख्या वीरांगनेची आठवण ठेवत, आपणही समाजासाठी काहीतरी चांगले करू शकतो ही भावना जपूया. असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमैय्या सय्यद यांनी केले. तर आभार अरविंद कुडीया यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment